निसर्ग पर्यटन हे मला विशेष आवडते. अर्थातच, निसर्गाचे अवलोकन, निसर्गाविषयी आदर आणि निसर्गात वावरताना निर्माण होणाऱ्या आठवणी मला महत्त्वाच्या वाटतात. माझ्यासोबत जे फिरले, त्यांनी अशा आठवणींचा खजिना पुरेपूर वसूल केला आहे. या खजिन्याचे नेमके वर्णन करताना सोबतच त्या निसर्गाचेही वर्णन केलेले आहे. पदभ्रमण मोहिमांना काहीसा इतिहास आणि भूगोल वर्णनातून जोडलेला आहे. शिवाय नकाशेही दिलेले आहेत. हे प्रवासवर्णन आणि त्यातून जुळलेली अतूट नाती निश्चितच भावतील. अशाच 'आठवणी निसर्गाच्या' गोळा होवोत या सदिच्छेने घेतलेला 'उमटलेल्या पाऊलांचा' हा मागोवा!